न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी गुरुवार दि. ११ एप्रिल २०१९ ते रविवार दि. १४ एप्रिल २०१९ या कालावधीत पिंपरी येथे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन गुरुवार दि. ११ एप्रिल २०१९ सायं. ६.०० वाजता आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रबोधनपर्वा अंतर्गत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ११ एप्रिल २०१९ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सकाळी १० वा. महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्या नंतर सकाळी १०.१५ वा. पिंपरी चौकातील महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी १०.०० वा. धिरज वानखेडे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होईल. दुपारी १.०० वा. जयराम जाधव यांचा भिम के दिवाने हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. सायं. ४ वा. चित्रसेन भवार यांचा “प्रबोधनात्मक महात्मा फुले यांना अभिवादन कार्यक्रम” सादर होणार आहे. सायं. ६.०० वा. डॉ. बबन जोगदंड व प्रा. प्रभाकर ओव्हाळ यांचे व्याख्यान तर रात्री. ८.०० वा. गणेश इनामदार यांचा महात्मा फुले यांच्या जीवनावरील नाटयप्रयोग सादर होईल.
शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी १० वा. सागर यल्लाळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी १.०० वा. महेंद्र सावंग यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर सांय. ४.०० वा. विश्वजीत शिंदे यांचा भिम जल्लोष ऑर्केस्ट्रा, साय. ६.०० वा. श्रीम. क्रांती खोब्रागडे, उपायुक्त आयकर विभाग पुणे यांचे – भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांविषयक कार्य/धोरण या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान होईल. तर रात्री ८.०० वा. विजयकुमार गवई यांचा वु द पिपल हा संगीतमय नाटयप्रयोग सादर होणार आहे.
शनिवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वा. संगित विशारद हरीष दळवी व सारीका गायकवाड यांचा “भिमवाणी” हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. दुपारी १२.०० वा. आदेश आटोटे यांचा “मजबुत भिमाचा किल्ला” हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होईल. दुपारी. ३.०० डॉ. दिप चहांदे, नागपूर यांचा “असा झालाच ना कोणी” प्रबोधनात्मक कार्यक्रम सदर होईल. सांयं ५.०० वा. जल आणि उर्जा संशोधन केंद्र खडकवासला पुणेचे ग्रंथालय व माहिती अधिकारी डॉ. डी. टी. गायकवाड यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जल व उर्जा क्षेत्रातील कार्य या विषयावर व्याख्यान होईल. सांय. ६.०० वा मुंबई विद्यापिठाचे संगीत विभागप्रमुख डॉ. कुणाल इंगळे व ऋतिका बोरकर यांचा “गाथा महापुरुषांची” हा प्रबोधनात्मक कार्यक्रम तर रात्री ८.३० वा. प्रा. प्रकाशकुमार वाघमारे यांचा “भिमा तुझ्या जन्मामुळे” हा नाटयप्रयोग सादर होणार आहे.
रविवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी. ६.०० वा. प्रसिद्ध गायक भूपेंद्र सवई नागपूर यांची “निळी पहाट” हो प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे. सकाळी ९.०० वा कुणाल कांबळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होईल. सकाळी १०.०० वा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १०.१५ वा. महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० वा. गौरव महाराष्ट्राचा फेम स्वप्नील पवार, संकल्प गोळे व शेखर गायकवाड यांचा “त्रिवार अभिवादन” प्रबोधनपर कार्यक्रम सादर होणार असून दुपारी १.०० वा. प्रसिध्द गीतकार, संगीतकार, गायक व प्रबोधनकारक प्रभाकर पोखरीकर यांचा “जिवाला जिवाच दाण अर्थात भिमशाही” हा प्रबोधनपर कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी ३.०० वा. प्रसिध्द गायीका उर्मिला धनगर, विशाल चव्हाण व साजन बेंद्रे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. सांय. ५.३० वा. कुणाल वराळे यांचा “युग पुरुष” हा प्रबोधनपर कार्यक्रम सादर होणार असून रात्री ९.०० वा. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सुप्रसिध्द पंजाबी गायीका गिन्नी माही यांचा “प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम” होऊन प्रबोधन पर्वाची सांगता होईल.










