न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १० एप्रिल ) :- पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी काळेवाडी परिसरातील विक्रम नढे पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१८ या सत्रात झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल फेब्रुवारी मध्ये जाहीर झाला असून, मराठीचा झेंडा पुन्हा डौलाने फडकला आहे. विक्रम यांनी या परीक्षेत भारतामध्ये ७१ क्रमांक मिळवला आहे.
न्यूज पीसीएमसी शी बोलतांना विक्रम नढे म्हणाले की, माझे सर्व कुटुंब वारकरी संप्रदायातले, वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती. पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे, त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. शिवाय वडील पोलीस पाटील व नगरसेवक असताना त्यांचे समाजकार्य मला नेहमी आकर्षित करे. हे समाजकार्य पाहून मी प्रेरित झालो.
माझे युवकांना एवढेच सांगणे आहे की, आपणाला आयुष्य हे एकदाच मिळते. त्यामुळे मोठे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. या मार्गात आपल्याला अपयश, अडचणी अशी बरीच संकटे येतील, परंतु, आपण कुठेही खचून जाऊ नका, असा मोलाचा सल्ला नढे यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी दिला.










