न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (१० एप्रिल ) :- शिरूर लोकसभेसाठी भरलेला अर्ज हा शिरूर लोकसभा मतदार संघातल्या प्रत्येकाचा अर्ज आहे. देशात परिवर्तनाची लाट असून, शिरूर लोकसभेमध्येही परिवर्तन अटळ आहे.
माय-बाप मतदारांनी संधी दिली तर, संसदेमध्ये शिरूर लोकसभेतील हमीभावासाठी झगडणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज घुमेल, तसेच हा आवाज बंद झालेल्या बैलगाडा शर्यतीतल्या बैलगाडा मालकांचा, माता-भगिनींचा आवाज असेल, असा ठाम विश्वास देत डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील कळीच्या मुद्द्यांना हात घालत आज अभूतपूर्व गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल केला.










