न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १० एप्रिल) :- काळेवाडी फाटा ते चिखलीकडे जाणाऱ्या बीआरटी मार्गालगत दिशाफलक लावण्यासाठी खड्डा खोदलेला आहे. हा खड्डा गेल्या काही दिवसांपासुन तापकिरनगर येथील जशनानी ट्रेडससमोर खोदलेला आहे.
या खड्यामुळे आज (बुधवारी) एका रिक्षाचालकाचा तोल सुटला. रिक्षा खड्यात जात असतानाच शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी सतर्कता दाखवून, वेळीच रिक्षा मागे ओढली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. रिक्षा खड्ड्यात गेली असती तर, रिक्षाचालकाच्या जीवितासही धोका पोहचू शकला असता.
शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी काही दिवसांपूर्वीच आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हा खड्डा बुजवण्याबाबतचे पत्र दिले होते. परंतु, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का? असा प्रश्न दाखले यांनी आयुक्तांना विचारला आहे.










