- भोसरीतील घटना; कंपनी व्यवस्थापकाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे गावच्या घरी राहुन फिर्यादी यांचा लहान भाऊ मयत सुशिल भिमसिंग पाटील (वय २७ वर्ष) हा वर्क फॉर्म होम काम करीत होता. त्याच्या कामाचा वेळ संपला तरी, त्यास काम करण्यास आरोपी भाग पाडत असत. काम वेळेत झाले नाही तरी त्यास वेळोवेळी धमकी देत. आरोपीच्या म्हणण्या प्रमाणे किंवा ओव्हर टाईम न केल्यास poor remark असा शेरा देवुन नोकरीवरुन काढुन टाकीन व त्यानंतर त्यास कोठेही नोकरी मिळणार नाही, असे बोलून धमकी देवुन मानसिक त्रास दिला.
काम चांगले असुनही आरोपीने आठ महीन्यात वेगवेगळया प्रोजेक्टवर बळजबरीने काम करण्यास भाग पाडले. त्याने तसे केले नाही म्हणुन तसेच त्याच दरम्यान त्याच्या कामामध्ये Static IP issue & Postman issue येवु लागले. त्यामुळे त्याला दिलेल्या कामात अडचणी येवु लागल्याने आरोपी यांनी त्याला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कामावरुन काढुन टाकले. वारंवार मानसिक व शारीरीक त्रास दिला. त्यापासुन होणाऱ्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने फिर्यादी यांच्या लहान भावाने (दि. १४/०६/२०२३) रोजी राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. त्याच्या मरणास आरोपी हेच कारणीभुत आहेत, असे फिर्यादीत म्हटल आहे.
ही घटना (दि. १४/०६/२०२३) रोजी सायंकाळी ६..०० वा. राहते घरात रामनगर भोसरी येथे घडली. फिर्यादी सागर भिमसिंग पाटील यांनी आरोपी निरज दीवेदी (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) एस. एच. जे इंन्टेल. टेक. प्राली कंपनी ५०६ सेखर सेंन्ट्रल, ४-५ मनोरमा गंज ए.बी रोड इंदोर, मध्यप्रदेश पिन क्रमांक – ४५२००१. या कंपनीचे ऑपरेशन मॅनेजर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ८०३ / २०२३ भा.द.वि. क ३०६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















