- शंभर एकरावर जरांगे पाटलांच्या जाहीर सभेचं आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 18 ऑक्टोबर 2023) :- मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या राजगुरुनगर येथे शुक्रवारी (दि. २०) होणाऱ्या सभेची जागा निश्चित करण्यात आली आहे.
पुणे-नाशिक महामागीलगत राजगुरुनगरजवळ खेड बह्यवळण घाटानजीक तुकाईवाडी हद्दीतील १०० एकर जागेवर ही सभा होणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पोलिसांसह मंगळवारी (दि. १७) या जागेची पाहणी केली. या सभेला ५ लाख मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सत्तेत सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात होत असलेल्या या भव्य सभेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


















