न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२३) :- हॉटेलमध्ये काम करणाऱ्या जनरल मॅनेजरने हॉटेलमधील गि-हाईकांचे ६५,८६७ रुपये स्वतःच्या खात्यावर स्कॅनरदवारे घेतले. अधीनस्त कर्मचाऱ्या कडुन हॉटेल व्यवसायाचे एकुण ९२,७८५ रुपये स्वतःच्या खात्यावर घेतले. तसेच हॉटेल कॅश काउंटरमधील १, २८,३५० इतकी रक्कम घेतली. तसेच अधिनस्त कर्मचाऱ्याकडून हॉटेलचे साहित्य खदेरीसाठी १७,००० घेतले. आणखी एकाकडुन ६६,५१० इतके तर एकाकडुन १,१७,००० इतके ऑनलाईन व्हेंडर पेमेंटसाठी पैसे घेतले. ते पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरुन फिर्यादीची ४,८७,५१२ रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे. तसेच हॉटेलच्या कामासाठी दिलेला मोबाईल घेवून आरोपी निघून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि २६ मे २०२३ रोजी ते आज रोजी पर्यंत) हॉटेल डॉर्टन, माण रोड हिंजवडी, फेज -१, ता मुळशी येथे घडला. फिर्यादी सुमेरसिंग सागरमल झाझेडीया यांनी आरोपी आशीष कोंडीबा घेबे (रा माण रोड, फेज १) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ११७०/२०२३ भादवि कलम ४०८, ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोनि खडके तपास करत आहेत.