न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२३) :- बचत गटाचे तसेच बँकेंचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फिर्यादीच्या भावाला पैशांची गरज होती. फिर्यादीच्या भावाने आरोपी १ ते ४ यांना पैसे दिले होते. ते पैसे परत मागितले असता त्यांनी ते दिले नाहीत. तसेच आरोपी यांनी दिलेले चेकदेखील बाउन्स झाले. आरोपींनी वारंवार मानसिक त्रास दिला. त्यामुळे फिर्यादीच्या भावाने आत्महत्या केली. त्यास आत्महत्या करण्यास आरोपी जबाबदार झालेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २) रोजी १२.०० च्या दरम्यान शिंदे वस्ती, सोमाटणे येथे घडला. महिला फिर्यादी यांनी आरोपी १) पांडुरंग सुर्यवंशी ऊर्फ (देवा), २.) प्रतिक जाधव, ३) गणेश वाळुंज, ४) आकाश बारणे ऊर्फ (नन्या) माऊली वडेवाले यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ५३५/२०२३ भा.द.वि. कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि वारे पुढील तपास करीत आहेत.