- वस्तु व सेवाकर कार्यालयाकडून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२३) :- पुण्यातील वस्तु व सेवाकर कार्यालय व्हॅट-सी, ७१२, नोडल – ०४, येरवडा यांचा आरोपी १) पुणे इंजिनिअरिंग टीन क्रमांक २७६५११०७४७६ चे व्यापारी संस्थेचे मालक मनोजकुमार बसंत पाल (रा. पीएमटी चौक, भोसरी), २) श्रीराम कॉर्पोरेशन प्रा.ली. विठठल कुंडलिक वेताळ (रा- गव्हाणेवस्ती भोसरी), ३) श्रीराम कॉर्पोरेशन प्रा.ली. नारायण जिजाबा धायगुडे ( राजगड कृष्णा हौ. सोसा. निगडी) यांनी पैकी आरोपी नं १ याने ६५, ४९, ४२८ रूपये व आरोपी नं २ व ३ यांनी ६५,४९,४२८ रूपये कर थकविला.
याप्रकरणी रविंद्र गौतम कवठेकर यांनी आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ८१६/२०२३ मुल्यवर्धित कर कायदा २००२ चे कलम ७४ (३) (ह) व (ट) अन्वये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.