न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२३) :- बैलपोळा सणाच्या दिवशी झालेले भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी यांच्या घराजवळ त्यांच्या भावकीतील आरोपी आले. त्यावेळी आरोपी यांनी फिर्यादी यांना ‘तुम्ही बैल पोळा सण हा पारंपारिक पध्दतीने साजरा करायचा सोडुन डी जे का लावला’ असे म्हणुन त्या कारणावरुन आरोपी यांनी फिर्यादी व फिर्यादीसोबत असलेले संदिप मोहन कोळेकर, संकेत माणिक कोळेकर, काळुराम मोहन कोळेकर, शुभम सुभाष कोळेकर, संभाजी गोंविंद कोळेकर यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास दत्तनगर, धामणी ता.खेड जि.पुणे येथे घडला. फिर्यादी बाबाजी रामदास कोळेकर यांनी आरोपी १. किरण बबन कोळेकर, २. समिर गोरक्ष कोळेकर, ३. शिवाजी मोहन कोळेकर, ४ वेदांत सुदाम कोळेकर, ५. अविनाष रमेश कोळेकर, ६ संभाजी गोंविंद कोळेकर (सर्व रा. धामणे ता. खेड जि. पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ६४० / २०२३ भा.द.वि.स. क. ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.