न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२३) :- चाकणच्या संगमनेर बँकेत शाखा अधिकारी पदावर असताना आरोपीने अधिकाराचा गैरवापर केला. स्वतःच्या फायदयासाठी बोगस ग्राहकाच्या नावे खोटा दस्तऐवज बनावटीकरण करून जाणूनबुजुन खोटे मूल्यवान रोख बनवुन कर्ज प्रकरणे मंजुर करून बँकेच्या रकमेचा अपहार करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार दि. २१/०९/२०२३ ते २७/०९/२०२३ घडला. फिर्यादी प्रकाश यांनी आरोपी विजय अडसूळ यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
त्यानुसार चाकण पोलीस ठाण्यात ८५९/२०२३ भा.द.वी. का. कलम. ४०९, ४६४.४६५, ४७७ (२) ५११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि मडके पुढील तपास करीत आहेत.













