न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२३) :- जागा खरेदी करण्यासाठी फिर्यादी व फिर्यादीची पत्नी जागा शोधत होते. फिर्यादीच्या पत्नीने मोबाईलवर आरोपी प्रोप्रायटर असलेल्या बंगलो प्लॉटची जाहीरात पाहीली. आरोपीच्या मोरवाडी पिंपरी येथिल ऑफिसवर फिर्यादी व फिर्यादीची पत्नी हे गेल्यावर आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला प्लॉटच्या प्रोजेक्टची जाहीरात, नकाशा, जमीनीचा सात बारा, जमीन मालक यांच्याशी झालेल्या व्यवहाराची कागदपत्रे व सदर ठिकाणचे प्लॉट दाखवले.
चार गुंठे जागा प्रत्येकी सहा लाख गुंठा असा दर ठरवून फिर्यादीकडून ऑनलाईन एकूण रक्कम ४,४८,००० रुपये (चार लाख अठ्ठेचाळीस हजार) घेतले. फिर्यादीस नोटराईस विसार पावती लिहून दिली. प्रत्यक्षात सदर जागेचे खरेदीखत करून न देता सदरचे कार्यालय बंद करुन आरोपी निघुन गेला. फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि. १३/०९/२०२३ ते १३/०८/२०२३) दरम्यान मोरवाडी, पिंपरी येथे घडली. फिर्यादी अभिमन्यु यांनी आरोपी विशाल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १०५२/२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.













