न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२३) :- मे २०१३ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान एका कंस्ट्रक्शचे भागीदार आरोपी ५ आणि १ यांनी पिंपरीतील शगुन चौक येथे जागेच्या विकसनासाठी पन्नास टक्के भागीदार देतो, असे फिर्यादीला आमिष दाखविले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्याकरीता त्यांच्याकडुन वेळोवेळी रक्कम स्विकारली.
ठरल्याप्रमाणे भागीदारी पत्र तयार करून भागीदार म्हणुन घेतले. दरम्यान पन्नास टक्के भागीदारी हिस्सा न देता तीस टक्के भागीदारी हिस्सा त्यांना घेण्यास सांगुन आरोपी यांनी फिर्यादीचा विश्वासघात केला. फिर्यादीसोबत भागीदारी करारपत्र करण्यापूर्वी महिला यांना दुकान विक्री केलेल्या दस्तांची माहिती त्यांच्यापासुन लपवुन, त्याचे सोबत भागीदारी करार पत्र केले. त्यानंतर त्यांच्या परस्पर ती एका कन्स्ट्रक्शन तर्फे आरोपी २ क्र. ३ यांस विकसीत करारनामा करून देवून, तसेच महिला यांना करेक्शन डिड द्वारे परस्पर जागा वाढवुन देवून वरील कोणताही दस्त करताना फिर्यादी यांना कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही तसेच त्यांची सही व संमती घेतलेली नाही. जागेच्या विकसनासाठी आणि एकास रक्कम देण्यासाठी फिर्यादीकडुन वेळोवेळी एकूण १,५४,००,००० रुपये (एक कोटी चोपन्न लाख रुपये) घेतले. सदर गुंतवणुकीच्या बदल्यात ठरल्याप्रमाणे सदर जागेवरील बाधकाम झाल्यानंतर त्यांना कोणताही हिस्सा तसेच गुंतवणुकीची रक्कम परत न करता, आरोपी यांनी स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी आपसात संगणमत करून गुंतवणुक केलेल्या रकमेचा अपहार करून फिर्यादी यांना धमकावून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे असे फिर्यादीत नमूद आहे, असे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
४८ वर्षीय फिर्यादी नवीन यांनी आरोपी १) तुलसिदास, २) साधूमल, ३) गोपाळ, ४) किशोर, ५) अर्जित (सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात १०७१/२३ भा.द.वि.क. ४२०,४०६,५०६, ३४ गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मसपोनि पलांडे पाहत आहेत.