न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी विचार प्रबोधन पर्व २०२३ निमित्त उद्या पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी मोकळ्या जागा तसेच वाल्मिकी समाज मंदिर, पिंपरीगांव येथे विविध कार्यक्रमांचे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आलेले आहे.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.
त्यानंतर सकाळी ११ वाजता उत्कृष्ट काम करणाऱ्या महापालिकेतील स्त्री,पुरुष सफाई कर्मचारी यांचा सत्कार सभारंभ पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी मोकळ्या जागा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तसेच सकाळी ११.३० वाजता खेळ पैठणीचा हा महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. तर सायंकाळी ५ वाजता हिंदी,मराठी जुन्या,नविन गाण्यांचा कार्यक्रम वाल्मिकी समाज मंदिर, पिंपरीगांव येथे संपन्न होणार आहे.