न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२३) :- बाणेर येथील जमीनीच्या ४.५ आर क्षेत्रात अतिक्रमण करण्याच्या उद्ददेशाने आरोपीने अनधिकृतपणे प्रवेश केला. मालकी हक्काचा बोर्ड खोडुन त्यावर स्वत: मालकीबाबत नाव लिहले. फिर्यादी व त्यांच्या वडीलांना सदर मिळकतीकडे फिरकायचे नाही; नाहीतर जिवे ठार मारीन, अशी धमकी दिली. इतरांसोबत बनावट दस्त तयार करुन त्यावर खोट्या सह्या करुन त्याद्वारे नमुद क्षेत्राच्या मिळकतीच्या मोजणी करीता अर्ज केला. त्यावर शासकीय अधिकारी यांच्या खोट्या सह्या व बनावट शिक्के मारुन त्यांचा गैरवापर करुन कट रचुन सदर बनावट कागदपत्राआधारे नमुद मिळकतीची विक्री करुन फिर्यादी आणि शासनाची आरोपीने फसवणुक केली आहे, असे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हा प्रकार (दि २८/८/२०२३ ते आजपावेतो) बाणेर येथील सन नं. मधील ४.५ आर क्षेत्रात घडला. फिर्यादी २९ वर्षीय दिगांत यांनी आरोपी बापु (रा. बाणेर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी १२२४/२०२३ भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ३४१ ४२७, ४४७, ४६७, ४६८, ४७१,४७२ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि यलमार पुढील तपास करीत आहेत.