न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२३) :- विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३ अंतर्गत सोमवारी (दि ३०) रोजी होणाऱ्या अफगाणीस्तान विरुद्ध श्रीलंका हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी वाहतुकीचा मार्ग आणि पार्किंग व्यवस्था पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने खालीलप्रमाणे निश्चित केली आहे.
१) मुंबईकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग खालीलप्रमाणे…
(अ) द्रुतगती मार्गाचे देहुरोड एक्झीटमधून डावीकडे वळावे. त्यानंतर तात्काळ परत डावीकडून वळून एक्सप्रेस हायवे लगतच्या मामुर्डीगावाच्या बाजूस असलेल्या सर्विस रोडने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
ब) द्रुतगती मार्गावरुन येणारी वाहाने किवळे ब्रिजवरुन मुकाई चौक येथून यु टर्न घेऊन कृष्णा चौक मार्ग एक्सप्रेस लगतच्या सिबॉसेस कॉलेच्या बाजुकाडील असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
क) जुना मुंबई पुणे हायवे प्रेक्षकांची वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बंगलोर हायवे वरील मामुर्डी जकात नाका जवळील अडरपास व रस्ताने येणारे प्रेक्षकाच्या वाहनांना शितलादेवी मंदीर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : सदर मार्गावरील वाहने शितलादेवी मंदीर येथून डाव्या बाजुस वळवून लेखा फार्म मार्गे असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
२) पुणे बाजुकडून येणा-या प्रेक्षाकाच्या वाहनांसाठी मार्ग खालीलप्रमाणे…
अ) पुणे बंगलोर हायवेवरुन पवना नदी ब्रिज, हॉटेल सॅन्टोंसा पास करुन किवळे ब्रिजवरुन वाहने सावकाश डाव्या बाजुकडे वळवावी व २०० मिटर वरुन दुतगती मार्गाचे डाव्या बाजुचे असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
ब) निगडी, हॉगींग ब्रिज कडुन येणारे प्रेक्षकांची वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्ग कृष्णा चौक येथून उजव्या बाजूस वळुन परत एक्सप्रेस हायवे पासून डाव्या बाजूस वळून असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
- ३) एम सी ए स्टडीयमकडून साईनाथनगर मार्गे येणारा जुना मुंबई पुणे महामार्गाकडे येणारा रस्ता हा एकतर्फी फक्त जाण्यासाठी वापरण्यात येत आहे. साईनाथनगर मार्गे स्टेडीयमकडे येण्यासाठी प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- १) सेंट्रल चौक साईनगर मार्गे कानेटकर बंगला चौककडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास बंदी असेल.
- २) मैदानाकडे प्रेक्षक येताना व सामना संपल्यावर परत जाताना त्याचे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना मज्जाव असेल.