- महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त काँग्रेसचा स्नेहमेळावा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल) :- महात्मा फुले जयंती निमित्त पिंपरी चिचंवड शहर काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते व पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने आज पिंपरीत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल व प्रदेश राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते व पिंपरी चिचंवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी घनःश्याम शेलार यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, मेळाव्याला सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी नुकतेच युवक काँग्रेसच्या चलो वार्ड अभियानात राज्यात उत्तम काम करत विशेष कार्यरत जिल्हा सन्मान मिळविल्याबद्दल युवक काँग्रेसच्या १८ व त्यांना या उपक्रमात सहकार्य करणा-या १० नागरिकांचा सन्मान प्रमाणपत्र, शाल व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. पर्यावरण विभागाच्या वतीने युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचा राजीव गांधी आदर्श युवा पुरस्कार मा. सोनल पटेल यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना सोनल पटेल म्हणाल्या, “मोदींचा पराभव निश्चित आहे. म्हणूनच ते बेताल वक्तव्ये करीत आहेत व त्यांनी सातत्याने जनतेची केलेली फसवणूक हे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण असेल”
मा. घनःश्याम शेलार म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या जोरावर पार्थ पवार हेच खासदार होतील व सर्व मित्र पक्षीय कार्यकर्ते मिळून शहराच्या झालेल्या विकासाच्या जोरावर विजयश्री खेचून आणतील”
याप्रसंगी अशोक मोरे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग) मनोज कांबळे (माजी अध्यक्ष महाराष्ट्र एनएसयूआय) निगार बारस्कर (उपाध्यक्ष महाराष्ट्र महिला काँग्रेस) गौतम आरकडे (कार्याध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभाग) नरेंद्र बनसोडे (शहराध्यक्ष युवक काँग्रेस) अशोक मंगल (अध्यक्ष पिं. चिं. पर्यावरण विभाग) माजी नगरसेवक अख्तार चौधरी, अभिमन्यू दहितुले, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, दिलीप मोहीते, सौ.सारिका जामनिक, सौ. विद्या भौईर, निखिल भोईर, संदेश नवले, आबा खराडे,अशोक काळभोर, मुन्साफ खान, रशीद सिद्दीकी, उमेश बनसोडे, आप्पासाहेब शिंदे, साबिर शेख, विजय ओव्हाळ, आयुष्य मंगल, विरेंद्र गायकवाड,अनिकेत अरकडे, करणसिंग गील,सौरभ शिंदे, सिध्दांत वानखेडे, अक्रम शेख, बालाजी डावरगावे आदि पदाधिकारी व बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.










