न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल) :- स्मार्ट सिटी गुणांकाबाबत केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये पिंपरी चिंचवड शहरास १९ वे स्थान प्राप्त झाले आहे. तर पुणे ११ व्या स्थानावर आहे.
नागपूर ३६७. ४२ अंक मिळवित पहिल्या स्थानावर आहे. तर, दुस-या क्रमांकावर अहमदाबाद तर सुरत तिस-या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काढण्यात आलेल्या निविदा, मार्किंग, प्रकल्पांतर्गत रस्ते आणि गृहनिर्माण आदींसाठी गुणांकन दिले जातात. याच्याच आधारावर यादी तयार केली जाते.










