न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२३) :- भविष्य निधी संघटना क्षेत्रीय कार्यालय निधी आकुर्डी यांच्यातर्फे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत सभासद आणि निवृत्ति वेतनधारकांसाठी ‘निधी आपके निकट’ हा कार्यक्रम चाकण येथे आयोजिण्यात आला होता.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्य आणि पेन्शनधारकांना भविष्य निर्वाह निधी योजनेच्या सर्व पैलूंशी संबंधित माहिती देण्यात आली. या वेळच्या ‘निधी आपके निकट’ कार्यक्रमात सदस्यांच्या नावाची दुरुस्ती, पीएफ खात्याचे हस्तांतरण, उमंग अॅप आणि डिजिलॉकर सेवांचा समावेश होता.
यामध्ये पेन्शनची माहिती देण्यात आली. पेन्शनचा अंदाज लावण्यासाठी कॅम्क्युलेटरची माहिती दिली. या कार्यक्रमात पीपीटीद्वारे आलोक कुमार व चंद्रशेखर आझाद यांच्याद्वारे सदस्यांना अॅडव्हान्स रकमेची प्रक्रिया आणि डिजिटल सिग्नेचर याबद्दल माहिती देण्यात आली.