न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२३) :- बंगलोर मुंबई हायवेने पुनावळेच्या दिशेने पांढऱ्या रंगाची महींद्रा पिकअपमधुन प्रतिबंधीत तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला वगैरे पदार्थांची विक्री करण्यासाठी दोघे घेऊन जाणार आहेत, अशी माहिती हिंजवडी पोलीसांना मिळाल. सापळा लावला गाडी अडवुन त्यामधील दोन इसमांना ताब्यात घेतले.
गाडीची पाहणी केली. त्यामध्ये विमल कंपनीचे गुटख्याचे बॉक्स व सुंगधी तंबाखुचे पाऊच मिळुन आले. हा माल पाहीजे आरोपी सुजीत खिंवसरा (रा. कोथरूड) याने विक्रीसाठी आणून दिल्याचे दोघांनी पोलिसांना सांगीतले. महींद्रा पिकअप वाहन व प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थ असा एकुण १८,१८,००० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. १) वाकाराम ठाकरारामजी जाट (वय १९ वर्ष), २) बोगाराम सुखराम बिष्णोई (वय १९) यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गु.र.नं. १२४३ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्रमांक ३) सुजीत खिंवसराचा हिंजवडी पोलीस शोध घेत आहेत.
मुखांचे कर्करोग व इतर विकार होऊन शारिरीक हानी होणारे शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखुजन्य गुटखा व पानमसाला पदार्थाचा साठा करून त्याची विक्री करीता नेत असलेला गुटखा पकडुन त्यातील आरोपींवर कारवाई करून हिंजवडी गुन्हे शोध पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.













