न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२३) :- नैसर्गिक पाणथळ व झरे हे नदी स्वच्छ करण्याचे काम करतात. परिसरातील जैवविविधता सुस्थितीत ठेवण्याचे काम करतात. तसेच नदी परिसरातील विहिरी व बोअरवेलचे प्रवाह वाढविण्याचे काम करते.
त्यामुळे मुळा नदीत मिळणारे नैसर्गिक नाले व झऱ्यांचे सर्वेक्षण पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. त्याद्वारे नदीत मिळणारे पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा न काढता एजन्सीची थेट पद्धतीने नेमणूक केली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्यात वाकड ते सांगवी पूल असे ८.८० किलोमीटर अंतराच्या एका बाजूचे काम केले जाणार आहे. या कामाचा आराखडा पुणे महापालिकेने तयार केला आहे. त्या प्रकल्पासाठी २७६ कोटी रुपये खर्च आहे. त्यापैकी ५५ लाख खर्चास २५ एप्रिल २०२३ ला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. परिसरातील नैसर्गिक नालाद्वारे प्रदूषित पाणी नदीत मिसळते. त्यामुळे जलचर प्राण्यांवर विपरीत परिणाम होत आहे.