न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी अस्थापनेवर शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) म्हणून १ वर्ष कालावधी करीता सन २०२३-२०२४ साठी मनपाचे अधिकृत वेबपोर्टल www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर (मुख्य पृष्ठ – आमच्याबद्दल – नोकरीविषयक- शिकाऊ उमेदवार नेमणूक सन २०२३-२४) पिंपरी चिंचवड मनपाच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत दिनांक ३०/१०/२०२३ रोजी सविस्तर जाहिरात प्रसिध्द करणेत आली आहे.
जाहिरात प्रकटनाच्या अनुषंगाने Online अर्ज स्विकारण्याच्या कालावधीला दिनांक २२/११/२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मनपा पोर्टलवरील जाहिरात प्रकटनाच्या अनुषंगाने (दि. २२/११/२०२३) पर्यंत apprenticeshipindia.gov.in (NAPS PORTAL) या संकेतस्थळावर ऑनलाईन apply करुन (दि. २४/११/२०२३) पर्यंत अर्ज व कागदपत्राची हार्ड कॉपी आय.टी.आय मोरवाडी येथे जमा करावी.













