न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड परिसरात उत्तर भारतीय नागरिक छट पूजा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा करतात. पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरा शेजारील पवना नदीच्या घाटावर देखील नाना काटे सोशल फाउंडेशन व उत्तर भारतीय संघटना यांच्या वतीने दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो.
येत्या १९ तारखेला उत्सव साजरा करण्यात येणार आहे याही वर्षी येथे मोठ्या प्रमाणात परिसरातील अनेक उत्तर भारतीय नागरिक उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येणार आहेत.
त्याची पुर्वतयारी म्हणुन या घाटावर नागरिकांची गैरसोय होवु नये म्हणुन घाटाची स्वच्छता करण्यात यावी, अशा सुचना नगरसवेक नाना काटे व शितल नाना काटे यांनी संबंधीत मनपा विभागाला केल्या होत्या. त्यानुसार आज घाटाची स्वच्छता करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.