न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२३) :- इंद्रायणी साहित्य परिषदेतर्फे दोन दिवसीय शनिवार (दि. १८) ते रविवार (दि. १९) रोजी दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन मोशीतील पद्मश्री मनोहर साहित्य नगरी, जय गणेश बंकट हॉल या ठिकाणी पार पडणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन परिषदेकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. डॉ. अमोल कोल्हे, आ. महेश लांडगे, मा. आ. विलास लांडे, गणेश सस्ते, सोपान खुडे, अरुण बोऱ्हाडे, संदीप तापकीर, प्रकाश रोकडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अरुण बोऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.














