न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२३) :- राहत्या घरी कौटुंबिक कारणावरून सख्या मुलाने चौकोणी आकाराचा लांब लाकडी वासा ६० वर्षीय आईच्या डोक्यात मारून तिला जिवे ठार मारले आहे.
ही दुर्दैवी घटना (दि. १४) रोजी रात्री ८.३० ते १०.०० च्या दरम्यान मामुर्डीगाव, देहुरोड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निळकंठ अश्रुबा शिंदे (वय ४१ वर्षे) याच्याविरुद्ध फिर्याद नोंदवून देहूरोड पोलीस ठाण्यात ६१४/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास सपोनि जाधव करीत आहेत.