न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल) :- आंतरराष्ट्रीय लायन्सच्या (३२३४-डिस्ट्रिक्ट २) वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हरिदास नायर यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे माजी संचालक नरेंद्र भंडारी, प्रांतपाल गिरीश मालपाणी, नियोजित प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, माजी प्रांतपाल राज मुच्छल, अभय शास्त्री, रवी सातपुते, प्रवीण गुलाटी आदी उपस्थित होते.
नायर हे गेली ३० वर्षापासून राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. निगडी येथील श्रीकृष्ण मंदिराचे ते संस्थापक अध्यक्ष व शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आजतागायत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.











