न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल) :- पुणे जिल्हा नेत्रतज्ञ संघटनेच्या सचिवपदी डॉ. बबन डोळस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डोळस यांनी शेकडो शिबिरांच्या माध्यमातून हजारो रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करुन आपले सामाजिक योगदान दिले आहे.
त्यांनी गेल्या वर्षी राज्य नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या सचिव पदाची यशस्वी धुरा सांभाळली. शहरातील खाजगी क्षेत्रात पहिली नेत्रपेढी सांगवी येथे सुरू करण्याचा बहुमान मिळवला आहे. पिंपळे सौदागर येथे सुरू केलेल्या ग्लोबल आय इंस्टिट्यूटचे संचालक आहे.











