- दिनेश सिंग आणि अमित यादव यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- रावेत येथील जाधव घाट येथे छठ महापूजेचे भव्य आयोजन केले असून त्याची पूर्वतयारी म्हणून आयोजक दिनेश सिंग व अमित यादव यांनी नदीची स्वच्छता केली. त्यासाठी जेसीबी व पोकलेनच्या साह्याने नदीपात्रातील गाळ काढण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
छठ महापूजेच्या कार्यक्रमात आज शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी सूर्यषष्ठी महावृत्त आरंभ होत असून शनिवारी १८ तारखेला छोट की छट (रसियाव रोटी)(खरना) तर रविवारी १९ तारखेला बडकी छठ (संध्या अर्घ) होणार असून सोमवार २० नोव्हेंबर रोजी पारण (प्राप्त: अर्घ) असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
रविवार १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. आणि सोमवारी सकाळी ५ वा. भव्य गंगा आरती होणार आहे.परिसरातील बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन अमित यादव यांनी केले आहे.
छट महापुजेच्या नियोजनात दिनेश सिंग व अमित यादव यांना त्यांचे सहकारी नरेंद्र मिश्रा, जैनद्र सिंह, अरविंद, प्रशांत, पंकज, शिवनाथ चौरासिया, अरुण उपाध्याय, अखिलेश श्रीवास्तव, अमित कौशिक, विश्वकर्मा, राजू श्रीवास्तव व मुकेश यांनी मोलाचे सहकार्य केले.













