न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२३) :- ‘फ्लॅट देण्याच्या आमिषाने फिर्यादीला विश्वासात घेवुन त्यांचे कागदपत्रे वापरून आरोपी एक याने फिर्यादीच्या नावे १६,२६,९५६ रु. किंमतीचे होम लोन तात्कालीन मॅनेजर आरोपी ३ याच्या मदतीने मंजुर करुन ते स्वत:च्या फायद्यासाठी वापरले.
बिल्डर आरोपी २ याने त्याचा देहुगाव येथील द्वारका स्किममधील फ्लॅट हा एकाला यापुर्वीच विकलेला होता. सदरचाच फ्लॅट फिर्यादी यांच्या नावे रजिस्ट्रेशन करुन फिर्यादी यांना पुन्हा विकला. आरोपी क्र १ ते ३ यांनी फिर्यादीची फसवणुक करुन १६,२६,९५६ रु. चे होमलोन फिर्यादीच्या नावावर परस्पर मंजुर करुन घेवुन ते आरोपी १ ते ३ यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार मार्च २०१७ ते आजपर्यंत देहुगाव येथील द्वारका स्किममध्ये घडला. फिर्यादी अमोल शिवाजी गेडेवाढ यांनी आरोपी १) गिरीष व्यंकट नारलावार, २) गिरीष धनराज भटेवारा, ३) राजेंद्र सुरेश शिळीमकर यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. देहुरोड पोलीस ठाण्यात ६२०/२०२३ भादवि ४०६, ४२०,३४ प्रमाणे तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि पाटील पुढील तपास करीत आहेत.