- वडीलांसह इतर नातेवाईकांच्या विरोधात दिली तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२३) :- १२ वर्षीय लहान बहिणीचे फिर्यादीच्या वडीलांसह इतर नातेवाईकांनी आरोपी ४ याच्या सोबत लग्न लावुन दिले. लग्नास मुलाचे वडील, आरोपी मुलाची बहिण, तीचा नवरा, तसेच मुलाचे आजोबा व त्यांच्यासोबत एक त्यांचा इरटीगा गाडीवारील ड्रायव्हर व ब्राम्हण असे सर्व हजर होते.
फिर्यादीच्या वडीलांनी फिर्यादीला लग्नाबाबत कोणाला सांगु नको, असे धमकाविले होते, म्हणुन फिर्यादी घाबरले. त्यांनी कोणासही काहीएक सांगीतले नव्हते. वरील प्रकार फिर्यादीने त्यांच्या आईला सांगुन आईसोबत फिर्यादी वाकड पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांची बहिण हि १२ वर्षांची आहे हे सर्वाना माहिती असताना देखील त्यांनी फिर्यादीला विरोध करुन त्यांच्या बहिणीचा बाल विवाह घडवुन आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि. १५) रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास थेरगाव येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी पिडीतेच्या २० वर्षीय भावाने वडील व इतर नातेवाईकांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी १११९/२०२३ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९,१०,११ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि दिवटे पुढील तपास करीत आहेत.













