- एकमेव अर्ज आल्याने जवळपास त्यांची निवड निश्चित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २२ नोव्हेंबर २०२३) :- देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नामनिर्देशित सदस्य पदाची निवडणूक शुक्रवारी (दि. २४) विशेष सभेत दुपारी एक वाजता देहू नगरपंचायत कार्यालयात होणार आहे. नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे या पदाची निवडणूक होत आहे. हवेलीचे प्रांताधिकारी या विशेष सभेचे पीठासन अधिकारी आहेत.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पूजा दिवटे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यावर सूचक योगेश काळोखे आणि अनुमोदक प्रवीण काळोखे यांच्या सह्या आहेत. पूजा दिवटे यांचा एकमेव अर्ज आल्याने जवळपास त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.
सध्या देहू नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (अजित पवार गट) सत्ता आहे. नव्याने स्थापन झालेल्या देहू नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अडीच वर्षांसाठी अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव आहे. प्रथम नगराध्यक्ष पदाचा मान स्मिता चव्हाण यांना देण्यात आला. सुरुवातीचे सतरा महिने चव्हाण नगराध्यक्षा होत्या.