- पिंपरीतील नवमहाराष्ट्र शाळेजवळ एकाने हातात कोयता घेऊन माजवली दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२३) :- हातामध्ये धारधार कोयता घेवुन ‘येथे सगळ्यांनी मला घाबरून रहायचे, मला सलमान भाई म्हणतात, आत्ताच हाफ मर्डरमधुन बाहेर आलो आहे, सर्वांनी मला हप्ता द्यायचा, नाहीतर एकेकाला तोडुन टाकीन’ असे म्हणत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे अंगावर आरोपी धावून जात होता.
तो कोयता घेवुन फिर्यादीच्या अंगावर धावून येताच फिर्यादी तेथुन घाबरून पळुन जावुन आडबाजुला लपुन बसले. तेव्हा त्यांनी पाहीले की, त्याच्या दहशतीला घाबरून तीथले लोक इकडे तीकडे पळु लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि २३) रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पिंपरी गावातुन नवमहाराष्ट्र शाळेकडुन म्हाडा कॉलनीकडे जाताना सार्वजनिक रोडवर, पिंपरीगाव येथे घडली.
फिर्यादी प्रकाश बहादूर शहा यांनी आरोपी सलमान शेख याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ११३४/२०२३, भादंवि कलम ३५२, ५०६, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोना पवार पुढील तपास करीत आहेत.