न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- आकुर्डी येथील सेंट जोसेफ चर्चमध्ये रक्तदान करून ख्रिश्चन बांधवांनी पाम संडे (झावळ्यांचा रविवार) साजरा केला. यावेळी फा. डेविस तारकन यांनी सकाळी प्रार्थना केली. त्यानंतर आकुर्डी परिसरातून फेरी काढली. चर्चमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५० जनांनी रक्तदान केले.
यावेळी रॉय थॉमस, जयसन पी, इम्यान्युएल, के.एम रॉय, बिजॉय, बिजू जोसेफ आदी उपस्थित होते. पाम संडे (झावळ्यांचा रविवार) हा ख्रिश्चन सण आहे. हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्या पूर्वी साजरा केला जातो. जेरुसलेम नगरीत येशुचा प्रवेश आणि त्या नंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवार ने होते.
याची उल्लेख नव्या करारातील चारही शुभवर्तमानांमध्ये केला गेलेला आहे. भारतात जास्त ख्रिश्चन चर्चमध्ये सकाळी पवित्र मिसाबलिदानात पाम आशीर्वाद ताकते व लोकांना देतात. ही पानाची पतीला क्रॉसचे आकारात बनवन्याची प्रता आहे. दक्षिण भारतात गोस्पेल वाच्याच्या वेळी फुले टाकतात यांनी येसूची यरुशलेमात प्रवेशाचे प्रतिबिंब आहे. यावेळी सर्वे लोक होझाना बोलून येशूची स्तुति करतात.











