न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२३) :- पुर्वी झालेल्या शिवीगाळीच्या कारणावरुन आरोपींनी संगणमत करुन मयत रितेश संजय पवार (वय ३१ वर्षे रा. महाळुंगे इंगळे ता. खेड, जि.पुणे) याच्या चेह-यावर लोखंडी कोयत्यांनी वार करुन व लाकडी दांडक्याने मारहान करुन त्याला जिवे ठार मारले.
तसेच फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उददेशाने आरोपी क्रं ३ याने त्याचे ताब्यातील लोखंडी कोयत्याने पाठीवर वार करुन व आरोपी ४ ते ५ यांनी लाकडी दांडक्याने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले. हि घटना (दि. २६) रोजी १२:३० वाजता महाळुंगे गावच्या हद्दीत रेणुका हॉटेल ते ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या रोडलगत प्रतिक गॅस रिपेअरिंग दुकानामध्ये घडली.
फिर्यादी संदेश बापुराव भोसले (वय २१ वर्ष धंदा ड्रायव्हर, रा. महाळुंगे) यांनी आरोपी १ शंभु भोसले, २. अभि जावळे, ३. वैभव आंधळे, ४. विनोद बटलवार, ५. शेखर नाटक, ६. छोटा साकेत यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलिसांनी ७८२/२०२३, भा.द.वि.क-३०२, ३०७, १४३, १४६, १४८, १४९, भा.ह.का.क- ४, २५, सहक्रिमिनल लॉ अमेटमेंट मधील कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे पुढील तपास करीत आहेत.
९४२२६१५४६२