न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शिवशाही व्यापारीसंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने पिंपरी विधानसभा या ठिकाणी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पूर्णाकृती पुतळ्यास डॉ. अशोक शिलवंत यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. मिलींदराजे भोसले, सत्यसेन शिरसाठे, संदिप मकासरे, मारूती पंढरी, शिवशाही व्यापारीसंघाचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, दिपक कांबळे, गोरख पाटील, मारूती मस्के, रविकिरण घटकार आदी उपस्थित होते.
तसेच शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या शुभहस्ते ऐतिहासिक बोधीवृक्षास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, विशाल बाविस्कर, सौरभ शेंडगे, अक्षय घटकार, माऊली जाधव, अशिष वाळके, अमोल तेलंगे अर्जुन दाखले आदी पदाधिकारी उपस्थित होते.











