- यशदात हजारोंच्या उपस्थितीत रंगाला ग्राम शिलेदारांचा भव्य पुरस्कार सोहळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२३) :- सन्मानित सरपंच आणि विकसनशील गाव यासाठी कार्यरत असणाऱ्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही राज्यातील ग्रामविकासाचे मोठे व्यासपीठ आहे. या परिषदेचा ग्रामिण विकासासाठी राज्याला मोठा हातभार लागत असून त्यांच्या मागणीनुसार व गरज पाहता मुंबईत सरपंच भवनाची लवकरच निर्मीती करण्यात येईल, असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुण्यात सरपंच परिषदेच्या पुरस्कार सन्मान सोहळ्या वेळी उपस्थितांना दिले.
रविवारी (दि.3 ) पुणे येथे खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे, ग्राविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पद्दमश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते राज्यातील विवीध पक्षातील व क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा गौरव सोहळा आयोजित केला होता.
हे होते पुरस्काराचे मानकरी:-
ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करणारे लोकप्रतिनिधी आ.बच्चू भाऊ कडू,आ.अभिमन्यू पवार, आ.सुनील शेळके, आ.कृष्णा गजबे, आ. सुमनताई आर. पाटील या लोकप्रतिनिधींना तर उत्कृष्ट काम केलेले मृद व जलसंधारण चे सचिव सुनील चव्हाण, भिवंडीचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे,राज्याचे शिक्षण सचिव शैलेंद्र देवळकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे, सतीश बुद्धे यासह सामाजिक क्षेत्रात उत्कृट काम केलेल्या पद्मश्री लीला पूनावाला यांचा समावेश आहे. या सह आदर्श सरपंच म्हणून राजश्री मनोहर भोसीकर नांदेड, दत्तात्रय खोटे बीड, ज्योती हेमराज पाटील जळगांव, चंद्रकांत साहेबराव पाटील चाळीसगाव, पांडुरंग शंकर तोरगले कोल्हापूर, जिजाभाऊ टेमगिरे आंबेगाव, निकिता चंद्रशेखर रानवडे मुळशी पुणे, विजय मुरलीधर शेवाळे अहमदनगर, सुनिता बाळू तायडे रावेर, सदानंद मंडोपंत नवले नाशिक यांचा समावेश आहे तर आदर्श ग्रामसेवक म्हणून आबासाहेब दिलीपराव खिलारे बीड, विजयसिंह विलासराव नलावडे धाराशिव, कमल तिडके- तावडे नांदेड आदर्श शिक्षक म्हणून सोमनाथ भंडारे वडू बुद्रुक ता.शिरूर, उत्तम महादेव कोकितकर आजरा कोल्हापूर, किशोर चंद्रकांत नरवाडे नांदेड, शहाजी महावीर जाधव लोहारा युवा उदयोजक म्हणून बाबू भैय्या उर्फ बाबासाहेब सुधाकर गर्जे बीड, सामाजिक मधून एकनाथ विठ्ठल गाडे जांभूळ तर आदर्श ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवहाळ यांचा समावेश आहे.
सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, आनंद जाधव, किसान जाधव,राज्य प्रसिध्दी प्रमुख बापू जगदाळे,राणीताई पाटील, शिवाजी आप्पा मोरे, आश्विनीताई थोरात, सुप्रिया जेधे, सुधीर पठाडे, नारायण वनवे कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे आदि उपस्थित होते.













