न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२३) :- भारतीय जनता पार्टीच्या नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी तेजस डेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरांमध्ये वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाते. वाहतूकदारांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. तेजस डेरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनेच्या वतीने त्यांच्यावर पुणे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वाहतूकदारांना समाजात सन्मान मिळवून देणे, समाजात निर्माण होणा-या अडचणी सोडविणे, त्यांना अपेक्षित न्याय मिळवून देण्याचे काम आदी कामे करावी लागणार आहे. वाहतूकच्या माध्यमातून पक्षवाढीला मदत होईल, असे कार्य करण्याची अपेक्षा पक्षश्रेष्ठींनी डेरे यांच्याकडून ठेवली आहे. त्यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रावर अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्यासह कार्याध्यक्ष प्रविण आखाडे, सरचिटणीस निलेश निम्हण यांच्या स्वाक्षरी आहेत.













