न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२३) :- सार्वजनिक रस्त्यावर हातातील देशी बनावटीचे पिस्टल उंचावून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. लोकांना धमकावुन, दशहत माजवली. ही घटना (दि. ४) रोजी सायंकाळी ७.५५ च्या सुमारास रायगड हॉटेलजवळ, ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली.
आदर्श उर्फ छोटया अशोक मगर (वय २४ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात ७१६/२०२३, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), सह क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम-३,७ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि सातपुते पुढील तपास करीत आहेत.













