- हरकती व सुचनांसाठी नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकासह इतर शहरांची हवा प्रदुषण दिवसेंदिवस खालवत आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंञण मंडळ यांनी शहरामध्ये हवा प्रदुषण कमी करणे बाबत उपाययोजना व निर्देशन पारित केले आहेत. तसेच मा.उच्च न्यायालयामध्ये मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरामधील हवा निर्देशांक खराब होत असल्यामुळे मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी SUO MOTO PUBLIC INTEREST LITIGATION पारित केलेला आहे.
त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Graded Response Action Plan (GRAP, श्रेणीबध्द प्रतिसाद कृती योजना) तयार करणे आवश्यक असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने Graded Response Action Plan तयार केले आहे व ते नागरिकांच्या हरकती व सुचनांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
नागरीकांसाठी सदरचे Graded Response Action Plan दि. ०५/१२/२०२३ ते दि. १९/१२/२०२३ पर्यंत मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहिल. याबाबत नागरीकांनी हरकती व सुचना environment@pcmcindia.gov.in या ई मेलवर किंवा लेखी पर्यावरण अभियांञिकी विभाग, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे दि. १९/१२/२०२३ पर्यंत नोंदविण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.













