न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२३) :- विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाचे आगमन चिखली येथील जाधववाडी व मोशी येथील बोऱ्हाडेवाडी तर चक्रपाणी वसाहत आणि धावडे वस्ती याठिकाणी झाले. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संकल्प यात्रेत सहभाग नोंदविला, उपक्रमांची माहिती घेतली आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभही घेतला.
विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभागातील नागरिकांना यावेळी देण्यात आला. त्यामध्ये बचत गट नोंदणी अर्ज वाटप, गट प्रमाणपत्र वाटप, मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे वाटप, आधारकार्ड दुरुस्ती केंद्र, पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत विविध योजना तसेच पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत लहान व्यावसायिकांसाठी १० हजार रुपये पर्यंतचे कर्ज अशा विविध योजनांचा समावेश होता.
जाधववाडी प्राथमिक शाळेच्या ठिकाणी ७०० पेक्षा जास्त तर बोऱ्हाडेवाडी प्राथमिक शाळेजवळ ९५० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. तसेच चक्रपाणी वसाहत येथे ४३५ तर धावडे वस्ती येथे ३४० हून अधिक नागरिक उपस्थित होते.
या संकल्प यात्रेवेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसदस्य राजेंद्र लांडगे, अश्विनी जाधव, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी डी. डी. कांबळे, वैद्यकीय अधिकारी निलेश ढगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, समाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, संभाजी आबा घरे, दत्ता फुगे, प्रताप भांबे, मारुती आहेर, महेश पोळ, देवकर मामा तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिक व मान्यवरांनी सामूहिक आत्मनिर्भर शपथ घेतली.












