न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२३) :- पुणे शहर हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टल सोबत बाळगत डांगे चौक येथे कामानिमीत्त येणार आहे, अशी माहिती वाकड पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. डांगे चौकात जावुन पोलिसांनी सापळा रचला. एक संशयित इसम तिथे आला. त्याची हालचाल संशयीत वाटल्याने लागलीच पोलीस स्टाफच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०२ जिवंत काडतुस (राऊंड) असे मिळून आले.
वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून आरोपीस अटक केली आहे. विशाल ऊर्फ रावण सिध्दु बनसोडे (वय २५ वर्ष रा. लमाणवस्ती, पीडीसी बँकेचे मागे, खडकवासला ता. हवेली जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे. ०८/१२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त आहे. आरोपी वर यापूर्वीदेखील गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सगो, सह. पोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, या श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा, श्री.डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, बाकड विभाग, पिपरी चिंचवड याचे मार्गदर्शनाखाली मा. श्री गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो. विभीषण कन्हेरकर, सपोफो बाबाजान इनामदार, सपोफी राजेंद्र काळे, पोहचा संदीप गवारी, पोहवा बंदु गिरे, पोहवा स्वप्निल खेतले, पोहया दिपक साबळे, पोहवा, अतिश जाधव, पोहबा, प्रमोद कदम, पोहवा विक्रांत चव्हाण, पोहवा अतिक शेख, पोना प्रशांत गिलबोले, पांना राम तळपे, पोशि, अजय फल्ले, पाशि भास्कर भारती, पांशि. स्वप्निल लोखंडे, पांशि कोतेय खराडे, पोशि विनायक धारगे, पोशि रमेश खेडकर, यांनी मिळून केली आहे












