न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२३) :- बाणेर येथील यो स्काईज एव्हिएशन इंस्टिट्यूटच्या वतीने इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन दिनानिमित्ताने नागरीकांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी औंध, बाणेर या परिसरातील सुमारे ५० अधिक जणांनी अनुभव घेतला. सर्वसामान्य नागरीकांना वैमानिक क्षेत्राची माहिती व्हावी, या हेतूने या शिबिराचे आयोजन केले होते.
यो स्काईज इन्स्टिट्यूटचे संचालक एअर फोर्स स्वॉड्रन लीडर(नि) अजेय परांजपे, संचालिका फ्लाईट इंस्ट्र्क्टर तृप्ती कर्णावट यांनी सहभागी झालेल्या नागरीकांना सिम्युलेटरची माहिती दिली.यावेळी आलेल्या नागरीकांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण सिम्युलेटर द्वारे दिले.
यावेळी परांजपे म्हणाले, देशात आजकाल विमान सेवेचा विस्तार होतोय ,मात्र उत्कृष्ट पायलटची उणीव भासत आहे. ती उणीव भरून काढून गुणवंत असलेल्या तरुणांनी या एव्हिएशन क्षेत्रात येणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही हे गेल्या वर्षी इन्स्टिट्यूट सुरू केले. या इंस्टिट्यूट च्या माध्यमातून वैमानिकांना होण्यासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही अत्यल्प खर्चात करीत आहोत. यामुळे याचा फायदा सर्वसामान्य घरातील तरुणांना होत आहे. एकूणच वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही हातभार लावत आहोत याचा आम्हाला आनंद आहे.
तृप्ती कर्णावट म्हणाल्या, विमानसेवेबद्दल ठराविक वर्गलाच थोडेबहुत माहिती आहे. त्यातही वैज्ञानिक कसे विमान चालवतो हे अद्याप माहिती नाही हि माहिती सर्वसामान्यांना व्हावी हा मागचा हेतु आहे. आज उत्कृष्ट पायलट बनण्यासाठी अधिकाधिक सरावाची आवश्यकता असते. सिम्युलेटरद्वारे या ठिकाणी सरावाची सुविधा कमी खर्चात उपलब्ध करून देत आहोत. पायलट बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.