न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 12 डिसेंबर 2023) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक अमृत पऱ्हाड यांचे सोमवारी (दि. 11) रोजी दुःखद निधन झाले आहे.
सलग चार वेळा ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर निवडून आले होते. त्यांनी पालिकेत माजी विरोधी पक्षनेतेपदीही काम केले आहे.
ते भारतीय जनता पक्षाचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते होते. आपल्या राजकिय कारकिर्दीची सुरवात भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पदापासून त्यांनी केली होती.













