न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२३) :- चिंचवडच्या काळभोर नगरमधील आदर्श नगर झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे या ठिकाणाहून अधिकारी दाखल झाले होते.
मात्र, या अधिकाऱ्यांना आदर्श नगर झोपडपट्टीतील नागरिकांनी हुसकावून लावले. झोपडपट्टी पुनर्वसन सर्वेक्षण योग्य पद्धतीने होत नसून स्थानिकांना डावलण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. नागरिकांच्या विरोधामुळे अधिकाऱ्यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला.













