न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२३) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुध्दीकरण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामकाजाकरीता महामंडळाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. २१) सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच शुक्रवारी (दि. २२) पाणीपुरवठा हा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, आर ॲंड डी दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील सर्व नागरिकांनी पाण्याचा साठा अगोदरच करून ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.