न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२३) :- महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या पुणे विभागात शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठीची जाहिरात www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एसटीच्या पुणे विभागातील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज अंतिम तारीख २२ जानेवारी आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी ६०० रुपये आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी ३०० रुपयांचा धनार्कष एसआरटीसी एसटी फंड अकाउंट पुणे या नावाने काढून तो अर्जासोबत जोडावा लागेल.
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक, एसटी विभागीय कार्यालय, शंकरशेठ रस्ता, पुणे या पत्त्यावर १६ ते २२ जानेवारी या कालावधीत समक्ष हजर राहून सकाळी १० ते सायंकाळी ५:१० या कार्यालयीन वेळेत (शनिवार व रविवार) वगळून) सादर करावी, अशी माहिती विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी दिली.