- २०१८ च्या पक्षांतर्गत निवडणूकीचा घेतला आधार..
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा धक्कदायक निकाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२४) :- राज्यातील सत्तासंघर्षावर आज बुधवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटाला धक्कादायक निकाल दिला. नवा नेता निवडला असल्यास तो मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला त्यांनी मान्यता देत शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निकाल दिला आहे. शिवसेना हा मूळ राजकीय पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भरत गोगावले यांची पक्षप्रतोदपदी केलेली नियुक्ती बरोबर असून त्यांचा व्हीप देखील योग्य असल्याचे त्यांनी निकाल देताना म्हटले आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदें यांची आहे. विधीमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच पक्ष असतो असेही ते म्हणाले.
दोन गट आक्षेप घेऊ शकतात पण विधिमंडळ बहुमत हाच खरा पक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच व्हीपवरील निरीक्षण नार्वेकरांनी बदललं आहे. शिंदेंच्या त्या १६ आमदारांनाही अपात्र करण्याची याचिका त्यांनी फेटाळली. शिंदेचे १६ आमदार पात्र आहेत असेही ते म्हणाले.
निकाल वाचन करताना ते म्हणाले, घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ ठरवताना पक्ष महत्वाचा असतो. दोन्ही बाजूंमधील राजकीय पक्ष कोण हे आधी ठरवणार असून दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनावर तारीख नव्हती. म्हणून शिवसेनेची जी घटना दिली ती मान्य नाही. २०१८ ला पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही. २०१८ ला पक्षाच्या घटनेत उद्धव ठाकरे यांनी केलली घटना दुरुस्ती चूक असल्याचे त्यांनी निकालात म्हटले. तसेच ती दुरुती नियमबाह्य ठरवली. निकाल देताना २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने जी घटना दिली तिचा त्यांनी आधार घेत ती ग्राह्य धरली. तसेच उलट तपासणीला उद्धव ठाकरे आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र त्यांनी अमान्य केले.
निकाल वाचन करताना पुढे ते म्हणाले, १० व्या सूचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्वच बघायचं आहे. पक्षाचा प्रमुख कोण मि फक्त एवढच ठरवणार आहे.
२०१८ मधील पक्षाची पदांची रचना मी मान्य करतो. १९९९ ची शिवसेनेची घटना मी मान्य करतो. खरी शिवसेना ठरविण्याचा अधिकार मला, ती घटनेवरून ठरविणार असल्याचे त्यांनी म्हटले. नेतृत्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार घेतो. शिवसेनेच्या घटनेत राजकीय कार्यकारणीचा फैसला अंतिम आहे. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. २०१८ ची पदरचना शिवसेनेच्या घटनेनुसार नव्हती. दोन्ही गटांमध्ये पक्ष प्रमुखांवरून मतमतांतरे होती.
पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावाही त्यांनी फेटाळला. पक्षाच्या घटनेनुसार शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत. गटनेत्यालाही ते पदावरून काढू शकत नाहीत. एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्याचा ठाकरे यांना एकट्याना तो अधिकार नाही. अस झाल तर पक्षातला कोणीच पक्षप्रमुखाला बोलू शकणार नाही. ठाकरेंकडून शिंदेची हकालपट्टी मान्य करता येत नाही. उद्धव ठाकरेंना कार्यकारिणीचा सपोर्ट नव्हता. पक्ष प्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रीय कार्यकारीणीच गटनेत्या बाबत निर्णय घेऊ शकते. पक्ष प्रमुखाला सर्वोच्च अधिकार देन हे लोकशाहीला घातक असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे.