- पालिकेकडून ट्रक आणि टेम्पो जप्त; आर्थिक दंडही ठोठावला…
कारवाईत नदीपात्रात भराव टाकणारे नितीन दर्शिले यांच्या मालकीचे ४ वाहने जात करण्यात आली आहेत, दामोदर तळीमट्टी यांचा ट्रॅक्टर, नागनाथ मंजुळे यांचा एक टेम्पो, लकाप्पा पुजारी यांचा एक टेम्पो अशी सात वाहने महापालिकेने जप्त केली आहेत. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे यांनी ही कारवाई केली. त्यासाठी पर्यावरण पथक, एमएसएफच्या जवानांची मदत घेण्यात आली. असा प्रकार आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन महापालिका पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केले आहे.














