- आयुक्तांकडून सेवानिलंबन अनं विभागीय चौकशीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२४) :- महापालिकेचा सफाई कामगार वनेश परदेशी याच्यावर जेजुरी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो कारागृहात असल्याने त्याचे सेवानिलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
परदेशी हा कासारवाडीच्या ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कामास आहे. त्याच्यावर ८ जुलै २०२३ ला खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, १२ जुलै २०२३ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यानंतर न्यायालयीन कोठडीमुळे येरवडा कारागृहात आहेत.
त्या कर्मचाऱ्याने ही बाब पाच महिन्यांपासून हेतूपरस्पर महापालिका प्रशासनापासून लपवुन ठेवली. त्यामुळे त्याचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, विभागीय चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.














