न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२४) :- साईबाबा मंदिरात गुप्तदान करायाचे असल्याचा ४५ ते ५० वर्षाच्या अनोळखी इसमाने फिर्यादीच्या दुकानात येवुन बहाना केला.
त्यांना भुरळ पाडुन त्यांच्या जवळील अंदाजे ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे शॉर्टगंठण व दोन सोन्याच्या अंगठ्या असे एकुण ८१,००० रुपये किंमतीचा ऐवज फसवणुक करुन घेवुन गेला.
हा प्रकार (दि. १६) रोजी दुपारी १.३० च्या सुमारास निगडी गावठाण येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. निगडी पोलिसांनी १७/२०२४ भा.दं.वि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला असून पोउपनि यलमार पुढील तपास करीत आहेत.














